ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 14 हजार 933 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 312 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 4 लाख 40 हजार 215 वर पोहचली असून, मृतांची संख्या 14 हजार 011 एवढी आहे.
सध्या देशात 1 लाख 78 हजार 014 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 2 लाख 48 हजार 190 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 35 हजार 796 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 62 हजार 655, तामिळनाडूत 62 हजार 087, गुजरातमध्ये 27 हजार 825, मध्यप्रदेश 12 हजार 078, आंध्र प्रदेश 9372, बिहार 7825, राजस्थान 15 हजार 232, उत्तरप्रदेश 18 हजार 322 तर पश्चिम बंगालमध्ये 14 हजार 358 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.









