ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात पब्जीसह 118 ॲप्सवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने ही बंदी घातली आहे.
देशाच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहचवणारी तसेच यूजर्सना असुरक्षित असलेल्या ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये लोकप्रिय ॲप पब्जी, बायडू, लाईफ अफ्टर, लुडो वर्ल्ड, ॲप लॉक, कॅरम फ्रेंड्स, टणटण यासारख्या ॲपचा समावेश आहे. बंदी घालण्यात आलेल्या काही ॲपच्या माध्यमातून यूजर्सचा डेटा चोरी होत असल्याच्या तक्रारी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडे दाखल झाल्या होत्या.









