ऑनलाईन टीम/नवी दिल्ली
सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)च्या जवानांनी आज मोठी कारवाई केली. भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केले. पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमारेषेवर ही कारवाई करण्यात आली. बीएसएफकडून ट्विट करत ही माहिती देण्यात आली आहे.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घुसखोर सीमारेषा पार करुन भारतात शिरण्याचा प्रयत्न करत असतानाच बीएसएफच्या जवानांनी त्यांना पाहिलं. जवानांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता घुसखोरांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर जवानांकडूनही प्रत्युत्तर देत गोळीबार करण्यात आला. यावेळी झालेल्या गोळीबारात पाच घुसखोर ठार झाले. ज्या ठिकाणी ही कारवाई करण्यात त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहे.