ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आता मंदावताना दिसत आहे. मागील 4 महिन्यांपासून दररोज सरासरी 80 हजारांच्या वर असणारी रुग्णसंख्या प्रथमच 55 हजारांवर आली आहे. मागील 24 तासात देशात 55 हजार 342 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 706 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 71 लाख 75 हजार 881 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 09 हजार 856 एवढी आहे.
सध्या देशात 8 लाख 38 हजार 729 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 62 लाख 27 हजार 296 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात आतापर्यंत 8 कोटी 89 लाख 45 हजार 107 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 73 हजार 014 कोरोना चाचण्या सोमवारी एका दिवसात करण्यात आल्या.