ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोनाबाधितांची संख्या 8 लाखांवर गेली आहे. मागील 24 तासात देशात 27 हजार 114 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 519 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 8 लाख 20 हजार 916 वर पोहचली असून, मृतांची संख्या 22 हजार 123 एवढी आहे.
सध्या देशात 2 लाख 83 हजार 407 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 15 हजार 386 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 2 लाख 38 हजार 461 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 1 लाख 9 हजार 140, तामिळनाडूत 1 लाख 30 हजार 231, गुजरातमध्ये 40 हजार 69, मध्यप्रदेश 16 हजार 657, आंध्र प्रदेश 25 हजार 422, बिहार 14 हजार 575, राजस्थान 23 हजार 174, उत्तरप्रदेश 33 हजार 700 तर पश्चिम बंगालमध्ये 27 हजार 109 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.









