पुणे
मागच्या पाच वर्षांत भारतातील एक्स्चेंज ट्रेडेड फंड्ससाठीच्या (इटीएफ) ऍसेट्स अंडर मॅनेजमेंटमध्ये (एयूएममध्ये) लक्षणीय वाढ झाली आहे. डिसेंबर 2014 ते डिसेंबर 2019 या कालावधीत एकूण एयूएममध्ये केवळ 2 अब्ज डॉलरवरून 14 अब्ज डॉलरपर्यंत वाढ झाली आहे. एस अँड पी डाऊ जोन्स कंपनीचे असिस्टंट डायरेक्टर वेद मल्ला यांनी याबाबत माहिती दिली. इक्विटी ईटीएफ एयूएममध्ये वाढ होण्यास सरकारने राबविलेले उपक्रम चालना देणारे ठरले आहेत. त्यातील एक उपक्रम हा निर्गुंतवणूक हा ठरला आहे. सेबीद्वारे नुकत्याच करण्यात आलेल्या निर्णयानुसार ईपीएफओला आता आपल्या निधीतील 50 टक्के रक्कम एस अँड पी बीएसई सेन्सेक्समध्ये गुंतवण्याची परवानगी देण्यात आली आहे.









