बेळगाव : भारतात पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना लॉकडाऊनमुळे परतीचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे बेळगावमध्ये मागील 7 महिन्यांपासून काही पर्यटक अडकून पडले होते. इंडोनेशिया येथील 10 नागरिक बेळगावमध्येच अडकले होते. या नागरिकांच्या परतीच्या प्रवासाला आता मान्यता मिळाली असून बुधवारी हे नागरिक मुंबईमार्गे इंडोनेशियाला रवाना झाले.
पाच कुटुंबे आपल्या परिवारासह पर्यटनासाठी बेळगावमध्ये आली होती. परंतु, लॉकडाऊनची घोषणा झाल्यामुळे ती कुटुंबे बेळगावमध्येच अडकून पडली. त्यांना ऑटोनगर येथील एका मशीदीमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. इंडोनेशिया सरकारशी संपर्क साधून त्यांना परत जाण्याची सात महिन्यांनंतर परवानगी मिळाली. भारतीय भाषा येत नसतानाही अत्यंत चांगली वागणूक येथील नागरिकांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.









