ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतातील 83 टक्के कोरोनाबाधित रुग्ण 60 वर्षाखालील असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. देशात आतापर्यंत 3588 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 99 जण दगावले आहेत. तर 229 जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. एकूण रूग्णांपैकी 41 टक्के करोनाबाधित रुग्ण हे 21 ते 40 टक्के वयोगटातील आहेत. तर 60 वर्षावरील रुग्णांची संख्या केवळ 17 टक्के आहे. त्यामुळे एकूण करोनाबाधितांमध्ये 83 टक्के रुग्ण हे 60 वर्षांखालील असल्याचे सांगण्यात आले आहे.