बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहेत. कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णसंख्येवर काँग्रेसने भाजपच्या नेतृत्वाखालील कर्नाटक राज्य सरकारवर टीका केली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रियांक खरगे यांनी भारतात सर्वाधिक कोरोना संसर्ग दर बेंगळूरमध्ये आहे. बेंगळूरमध्ये कोरोना सकारात्मकतेचे प्रमाण १२.५ टक्के आहे. शहरात कोरोना संक्रमणाचे प्रमाण एका महिन्यात १.६ टक्क्यांवरून २.६ टक्क्यांवर गेले आहे.
तसेच गुलबर्गातील चित्तापूर मतदारसंघाच्या आमदारांनी सरकारने शहरे व ग्रामीण भागांचा त्याग केला आहे. सरकारला ग्रामीण भागांचा विसर पडला आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या वाढत असूनही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. ग्रामीण भागात कोरोना तपासणीचा अहवाल मिळण्यास एक आठवड्यापेक्षा जास्त काळ लागत आहे असा आरोप केला.
सोमवारपर्यंत बेंगळूर शहर सोडून राज्यात सर्वाधिक सक्रिय प्रकरणे बेंगळूर ग्रामीण (३६०२), दक्षिण कन्नड (२४२७), तुमकूर (२१९३) आणि म्हैसूर (२१५७) येथे नोंदविली गेली आहेत.









