- अमेरिकरतील डॉक्टरांचा भारताला सल्ला
ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
भारतातील अनेक राज्यांत अनेक निर्बंध लागू केल्यानंतरही कोरोना संक्रमणाचा वेग काही नियंत्रणात येतान दिसत नाही. अनेक राज्यांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक अवस्थेत आहे. याच दरम्यान, भारतासारख्या देशात कोरोना साखळी तोडण्यासाठी काही आठवड्यांसाठी संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचे मत अमेरिकेतील साथरोग तज्ज्ञ डॉ. अँथनी एस फौसी यांनी केले आहे.
‘त्वरीत’ काही दिवस देशात ‘संपूर्ण लॉकडाऊन’ लागू केल्यास कोविडवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, असे विधान एका मुलाखतीत डॉ. फौसी यांनी शुक्रवारी केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सरकारमध्ये डॉ. अँथनी फौसी मुख्य आरोग्य सल्लागार म्हणून जबाबदारी हाताळत आहेत.
- भारतातील परिस्थिती कठीण
भारतात ज्या पद्धतीने कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजन आणि बेडसाठी झगडावे लागत आहे. या सोबतच औषधांचा काळाबाजार सुरू आहे. लोक आणि प्रशासन हतबल होताना दिसत आहेत. काय करावे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. नियंत्रणाबाहेर जाणाऱ्या कोरोनामुळे भारत सध्या मोठ्या कठीण परिस्थितीतून वाटचाल करत आहे. अशा स्थितीत देशासमोर काही आठवड्यांसाठी संपूर्ण हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
- लसीकरण मोहिमेला वेग देण्याची गरज
बायडन प्रशासनाचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. फौसी यांनी लसीकरण मोहिमेला जोर देण्याची गरज आहे असे म्हटले आहे. पुढच्या काही आठवड्यांत लसीकरण मोहीम वेगाने केली तर या परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.









