बारा सेंटीमीटरचे आकार
नेचर कंजर्वेशन सर्कलचे कार्याध्यक्ष भरत शहा यांना दिसले फुलपाखरू
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
महाराष्ट्र राज्याचे मानचिन्ह असलेले व भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखरू नुकतेच सोलापुरात आढळले आहे. साधारणता बारा सेंटीमीटर आकार असून हे फुलपाखरू पश्चिम घाटाकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करून सोलापूर शहर परिसरात येतात. हे फुलपाखरू सोलापूर शहरातील सम्राट चौक परिसरातील प्रभाकर महाराज रोड, भगवती महावीर हाउसिंग सोसायटी येथे नेचर कंजर्वेशन सर्कलचे कार्याध्यक्ष भरत शहा यांना ब्ल्यू मॉरमॉन दिसले असल्याचे सांगितले.
‘ब्ल्यू मॉरमॉन’ चा आकार साधारणपणे १२ ते १५ सेंटिमीटर एवढा असतो काळे निळसर पंख्, त्यावर चमकदार निळसर ठिपके असलेल्या या फुलपाखराचे शरीर तीन भागात विभागलेले असते. चार आकर्षक पंख, अंगावर संवेदना असणारी ही त्याची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. पश्चिम घाटात आढळणाऱ्या ब्ल्यू मॉरमॉन पपिलियोचे पालीमनेस्टर हे शास्त्रीय नाव आहे. राज्यातील एकूण फुलपाखरुमध्ये ब्ल्यू मॉरमॉन पंधरा टक्के नोंदवली आहे. लिंबू, संत्रे, बेल या त्याच्या आवडत्या वनस्पती आहेत. पावसाळ्यात ही फुलपाखरे बागांमध्ये माळरानावर दिसून येतात असेही छेडा यांनी सांगितले.









