ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतातील कोरोना रूग्णसंख्येने 55 लाखांचा आकडा पार केला आहे. मागील 24 तासात देशात 75 हजार 083 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1053 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 55 लाख 62 हजार 664 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 88 हजार 935 एवढी आहे.
सध्या देशात 9 लाख 75 हजार 861 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 44 लाख 67 हजार 868 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात आतापर्यंत 6 कोटी 53 लाख 25 हजार 779 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 9 लाख 33 हजार 185 रुग्णांची तपासणी सोमवारी एका दिवसात करण्यात आली.