भारताला गावांचा देश म्हटले जाते आणि येथील प्रत्येक गावाची स्वतःची एक अनोखी कहाणी आहे. भारताला समजून घ्यायचे असल्यास गावांमध्ये वास्तव्य करा असे म्हटले जाते. देशातील अनोख्या गावांविषयी जाणून घेणे रंजक ठरणार आहे.
60 कोटय़धीश असणारे गाव
महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्हय़ातील हिवरे बाजार गाव कठोर मेहनत आणि दृढ संकल्पाने काहीही शक्य असल्याचा विश्वास देणारे आहे. हे गाव एकेकाळी गरीबी आणि दुष्काळाला तोंड देत होते. परंतु आता येथे 60 हून अधिक कोटय़धीश आहेत. या गावात शोधूनही डास सापडणार नाही. डास शोधून देणाऱया व्यक्तीला सरपंचाकडून 400 रुपयांचे इनाम दिले जाते.









