ऑनलाईन टीम / मुंबई :
भारताच्या महिला संघाच्या प्रशिक्षकपदी मुंबईच्या रमेश पोवार यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी 2018 साली देखील पोवार यांची भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती. पण त्यावेळी काही वाद झाल्याने त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. पण आता पुन्हा एकदा पोवार यांच्याकडे भारताच्या महिला संघाचे प्रशिक्षकपद देण्यात आले आहे.

दरम्यान, तुषार आरोठे यांच्या जागी 2018 मध्ये त्यांच्याकडे भारतीय महिला संघाच्या मुख्य कोचची जबाबदारी देण्यात आली होती. टी-20 वर्ल्ड कपदरम्याने रमेश पोवार आणि अनुभवी खेळाडू मिताली राज यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर रमेश पोवारांना पदावरुन हटवण्यात आले होते.
रमेश पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी महिला क्रिकेट संघाने टी 20 वर्ल्ड स्पर्धेत सेमीफायनल गाठली होती. भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर मिताली राज आणि कोच रमेश पोवार यांच्यातील वाद समोर आला होता.









