कोची \ ऑनलाईन टीम
भारताचे माजी फुटबॉलपटू ओ. चंद्रशेखर मेनन यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. गेले काही महिने चंद्रशेखर विविध आजारांनी ग्रासले होते. मंगळवारी कोची येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.
१९६२ साली आशीयाई क्रीडा स्पर्धेत त्यानी भारतीय संघाने सुवर्णपदक पटकावले होते. या संघाचे नेतृत्व त्यांनी केले आहे. त्यांनी अनेक सामन्यात भारताच्या फुटबॉल संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच १९६० साली रोम येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे ते सदस्य होते. यासह अनेक स्थानीक फुटबॉल सामन्यात त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते. १९५९ साली आशीयाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) चंद्रशेखर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. १९५८ ते १९६६ दरम्यान २५ सामन्यात त्यांनी भारताचे नेतृत्व केले. तर १९५९ ते १९६५ दरम्यान त्यांनी स्थानीक फुटबॉल सामन्यात महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते.
Previous Articleमाजी मंत्र्यावर आली पिझ्झा डिलिव्हरी करण्याची वेळ
Next Article रिक्त पदांवरून गोंधळ, प्रतिनियुक्त्या होणार रद्द









