कृषी मंत्रालयाकडून आकडेवारी सादर
नवी दिल्ली
कृषी मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार भारताचे अन्नधान्य उत्पादन चालू पीक वर्ष 2020-21 या कालावधीत जवळपास 2.66 टक्क्यांनी वाढून 30 कोटी 54.3 लाख टनाचा नवा विक्रम प्राप्त करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. चालू वर्षात सकारात्मक मान्सूनमुळे तांदूळ, गहू आणि डाळींचे चांगले उत्पादन होणार असल्याचे कारण देण्यात आले आहे.
पीक वर्ष 2019-20 (जुलै-जून) मध्ये देशाचे अन्नधान्य उत्पादन विक्रमी 29.75 कोटी टनावर राहिले होते. पीक वर्ष 2020-21 च्या तिसऱया अंदाजानुसार कृषी मंत्रालयाने धान्य उत्पादन विक्रमी 30 कोटी 54.3 लाख टन होणार असल्याची शक्यता आहे.
प्रमुख पिकांचे उत्पादन (आकडेवारीचा अंदाज)
? पीक वर्ष 2020-21 मध्ये तांदळाचे उत्पादन विक्रमी 12 कोटी 14.6 लाख टन होण्याचा अंदाज आहे.
? गव्हाचे उत्पादन हे 2020-21 मध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत 10 कोटी 78.6 लाख टनाच्या विक्रमासह 10 कोटी 87.5 लाख टन होण्याचे भाकीत मांडले आहे.
?बिगर खाद्यान्न वर्गातील उत्पादन हे तीन कोटी 65.6 लाख टन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.









