डिचोली/प्रतिनिधी
बुधवार दिनांक 9 फेब्रु. रोजी भारताचे केंद्रीय गृहमंत्री श्री आमीत शहा डिचोली मतदारसंघात प्रचार सभा घेणार आहेत. सभेपूर्वी अमित शहा संध्याकाळी चार वाजता डिचोली ग्रामदेवता श्री देवी शांतादुर्गा मातेच्या आशीर्वाद घेऊन गावकरवाडा येथून मतदारांशी थेट संपर्क साधणार आहेत. वरील रॅली आतील पेठ सुंदर पेठ सोमवार पेठ असा दौरा करून संध्याकाळी 5.30 वा. सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. हिराबाई झांटय़? हॉल प्रांगणात ही जाहीर सभा होणार आहे.
या सभेसाठी भाजपा उमेदवार राजेश पाटणेकर. गोव्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत, गोवा राज्य भाजपा अध्यक्ष श्री सदानंद शेट तानावडे, उत्तर गोवा खासदार आणि केंद्रीय मंत्री श्री श्रीपाद भाऊ नाईक, राज्यसभा खासदार श्री विनय तेंडूलकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.









