ऑनलाईन टीम / अबूधाबी :
भारताची राफेल विमाने थांबलेल्या संयुक्त अरब आमिरातीच्या (यूएई) अल धाफ्रा हवाई तळाजवळ इराणने युद्धसरावादरम्यान तीन क्षेपणास्त्र डागली. ही क्षेपणास्त्र समुद्रात पडल्याने पुढील धोका टळला.
सोमवारी सकाळी फ्रान्सच्या मेरिनॅक एअर फोर्स तळावरुन पाच राफेल विमानांनी उड्डाण केले होते. भारतात दाखल होण्याआधी यूएईच्या अल धफ्रा एअर बेसवर एक रात्र भारताची ही राफेल फायटर विमाने थांबली होती. त्याचवेळी इराणच्या लष्करी सरावामुळे यूएईमधील अल धफ्रा आणि कतारमधील अल उदीद एअर बेसवर अलर्ट जारी करण्यात आला होता.
यूएईमधील अल धफ्रा आणि कतारमधील अल उदीद
या दोन एअर बेसच्या दिशेने इराणची मिसाइल येत असल्याचे संकेत मिळाले होते. पण कुठल्याही हवाई तळावर ही मिसाइल्स धडकली नाहीत. इराणने डागलेली तीन क्षेपणास्त्रे याच दोन एअर बेसजवळच्या समुद्रात पडली. त्यामुळे धोका टळला. आज दुपारी राफेल विमाने भारतात दाखल होतील.