2022 मध्ये प्रतिदिन 51.5 लाख बॅरेलची होतेय वाढ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या कारणास्तव झालेल्या नुकसानीमुळे अर्थव्यवस्थेला रुळावर येण्यासोबत भारताची कच्च्या तेलाची मागणी 2022 मध्ये 8.2 टक्क्यांनी वधारुन 51.5 लाख बॅरेल प्रतिदिन राहिल्याचा अंदाज आहे.
पेट्रोलियम पदार्थ निर्यात करणाऱया देशांची संघटना ओपेक यांनी आपल्या मासिकामध्ये तेल बाजाराच्या अहवालात विविध मुद्यांची माहिती दिली असून यामध्ये भारतामध्ये कच्च्या तेलाची मागणी 2022 मध्ये 3.9 लाख बॅरेल प्रतिदिन वाढत गेल्याची नोंद केली आहे.
हिच मागणी 2020 मध्ये प्रतिदिन 45.1 लाख बॅरेलवरुन 5.61 टक्क्यांनी वधारुन 2021 मध्ये 47.6 लाख प्रति बॅरेलवर राहिली होती.
मागणीत सुधारणा
2022 मध्ये 7.2 टक्क्यांची मजबूत आर्थिक वृद्धी आणि महामारीवर नियंत्रण मिळवण्यासोबत कच्च्या तेलाच्या मागणीत सुधारणात्मक परिस्थिती असून औद्योगिक क्षेत्रातून डिझेल, एलपीजीची मागणी तेजीत राहिली व विमान इंधनाच्या मागणीत मात्र हलक्या स्वरुपाची सुधारणात्मक स्थिती राहिली आहे.









