वृत्तसंस्था / बर्मिंगहॅमा
येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या ब्रिटीश खुल्या कनिष्ठांच्या स्क्वॅश स्पर्धेत भारताची स्क्वॅशपटू अनहात सिंगने मुलींच्या 13 वर्षांखालील वयोगटात अंतिम फेरीत प्रवेश मिळविताना इजिप्तच्या गॅलेलचा पराभव केला.
मुलींच्या 13 वर्षांखालील वयोगटातील उपांत्य लढतीत अनहात सिंगने इजिप्तच्या गॅलेलचा 7-11, 11-7, 13-11, 5-11, 17-15 असा पराभव केला. आता अनहात सिंग आणि इजिप्तची टॉप सीडेड अमिना ओरफी यांच्या जेतेपदासाठी लढत होईल. मुलांच्या 19 वर्षांखालील वयोगटात भारताच्या वीर चोटराणीने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.









