मुंबई
कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या प्रभावामुळे आता विविध रेटिंग्स कंपन्या भारताच्या आर्थिक विकासदराचे अंदाज मांडत आहेत. यामध्ये सध्या संयुक्त राष्ट्र (युएन) यांनी मांडलेल्या अंदाजामध्ये भारताची जीडीपी वाढ ही चालू वर्षात 7.5 टक्क्यांच्या जवळपास राहणार असल्याचे सांगितले आहे. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीसाठी हा अंदाज नोंदवलेला आहे. एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत या कालावधीत जीडीपी वाढ ही 10 टक्क्यांवर राहणार असल्याचे या अगोदर ब्रोकरेज हाऊसने अंदाज नोंदवला आहे.
युएनने दिलेल्या माहितीमध्ये जानेवारीत नेंदवलेल्या अंदाजामध्ये बदल करुन त्याच्या तुलनेत 0.2 टक्क्यांनी जीडीपी वाढणार असल्याचे म्हटले होते. परंतु पूर्ण वर्षात देशातील अस्थिर वातावरणामुळे जीडीपीत मोठा चढउतार राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.









