ऑनलाईन टीम/नवी दिल्ली
पुर्व लडाख भागात भारत-चीन दरम्यान अजून तणाव सुरु आहे. या तणावानंतर भारताने चीनच्या वस्तूवर बंदी घालत चीनला झटका दिला होता. याआधीही चीनी अॅपवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर रेल्वेकडूनही काही कंत्राट रद्द करण्यात आले होते. आता पुन्हा रेल्वेकडून चीनला आणखी एक झटका देण्यात आलाय.
भारतीय रेल्वेनं आता ४४ सेट सेमी हाय स्पीड ट्रेन (वंदे भारत एक्सप्रेस) च्या निर्माणासाठी जारी केलेली निविदा (Tender) रद्द करण्याची घोषणा केलीय. सेमी हाय स्पीड ट्रेन ‘वंदे भारत एक्सप्रेस’साठी मागवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निविदेत चीनच्या सरकारी कंपनीचाही समावेश होता. रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संशोधित सरकारी खरेदी ऑर्डरनुसार, नवी निविदा जारी केली जाईल. यामध्ये ‘मेक इन इंडिया’ला प्राधान्य दिलं जाणार आहे.
‘४४ प्रोपल्सन सिस्टम’साठी भारतीय रेल्वेनं आंतरराष्ट्रीय निविदा मागवल्या होत्या. या निविदेत चीनची सरकारी कंपनी ‘सीआरआरसी पायोनिअर इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’चा समावेश होता. चीनची ही कंपनी गुरुग्रामच्या एका कंपनीसोबत संयुक्तरित्या काम करतेय. या दोन्ही कंपन्या मिळून भारतात काम करतात. या निविदेसाठी इतर कंपन्यांत दिल्लीची ‘भेल’, संगरुरची ‘भारत इंडस्ट्रीज’, नवी मुंबईची ‘पॉवरनेटिक्स इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड’, हैदराबादचा ‘मेधा ग्रुप’ आणि परवानूची ‘इलेक्ट्रोवेव्स इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपन्यांचा समावेश होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









