वृत्तसंस्था/ दुबई
एएफसी 23 वर्षाखालील वयोगटाच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी रविवारी रात्री येथे झालेल्या पात्र फेरीच्या सामन्यात भारताने ओमानचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात 7 व्या मिनिटाला भारताचे खाते रहीम अलीने उघडले. 38 व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल विक्रमने नोंदविला. मध्यंतरापर्यंत भारताने ओमानवर 2-0 अशी आघाडी घेतली होती. खेळ संपण्यास केवळ 1 मिनिट बाकी असताना वालीद हवेदने अब्दुलाच्या पासवर ओमानचा एकमेव गोल नोंदविला. भारतीय फुटबॉल संघाला स्टिमॅक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









