ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताचा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 26 क्रमांकांनी घसरला आहे. विविध देशातील आर्थिक परिस्थिती आणि व्यवसायिक वातावरणाचे मूल्यमापन करणाऱ्या कॅनडामधील फ्रेजर इन्स्टिटयूटने प्रकाशित केलेल्या ‘ग्लोबल इकनॉमिक फ्रिडम इंडेक्स’मधून ही माहिती समोर आली आहे.
आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात हाँगकाँग पहिल्या तर सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे दोन्ही भारतापेक्षा खूपच लहान आहेत. भारत या यादीत आता 105 व्या स्थानी आहे. मागील वर्षी भारत या यादीत 79 व्या क्रमांकावर होता. या अहवालात 162 देशांचा समावेश आहे.
एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराने उणे 23.9 % ऐतिहासिक निच्चांकी घसरण झाली आहे. भारतातील बांधकाम, खाणकाम आणि उत्पादन क्षेत्रात मोठी घसरण झाली आहे.
फ्रेजर इन्स्टिटयूट दरवर्षी विविध देशातील जागतिक स्तरावरील व्यापाराचे स्वातंत्र्य, आर्थिक मोबदला, मनुष्यबळ आणि व्यवसाय यासारख्या व्यवसायाशी संंदर्भात महत्वाच्या मुद्द्यांवर हा अहवाल सादर करते.









