आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज – पडझडीनंतर अर्थव्यवस्था सावरतेय
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
कोरोनानंतरचा कालावधी हा विविध बदलासोबत सुरु झाला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रभाव राहिलेल्या क्षेत्रात उद्योगांसोबत आर्थिक क्षेत्र सर्वाधिक प्रभावीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. परंतु हा प्रभाव काहीसा निवळत असल्याचे विविध अंदाजामधून समोर येत आहे. यामध्ये या घडीला 2021 मध्ये भारताचा आर्थिक वृद्धीदर जवळपास 11.5 टक्क्यांवर राहण्याचे संकेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून देण्यात आले आहेत.
कोरोना महामारीनंतर अर्थव्यवस्थेमध्ये भारत हा एकमेव देश असा राहणार आहे, की ज्याचा आर्थिक वृद्धीदर चालू वर्षात दहा टक्यावर राहणार असल्याची माहिती मंगळवारी जागतिक आर्थिक परिस्थितीच्या आधारे नमूद केली आहे.
अर्थव्यवस्थेमध्ये तेजीने होत असणाऱया बदलातून वर्ष 2020 मध्ये महामारीच्या कारणामुळे 8 टक्क्यांची घसरण राहणार असल्याचा अंदाज होता. नाणेनिधीकडून अद्यावत केलेल्या अहवालानुसार 2021 मध्ये आर्थिक वृद्धीदर 11.5 टक्क्यांवर राहण्याचे संकेत आहेत. चालू वर्षात भारताची अर्थव्यवस्था मजबूत प्रवास करणार असल्याचे भाकीत व्यक्त केले असून यामध्ये 2021 मध्ये 8.1 टक्क्यांसोबत चीन दुसऱया नंबरवर राहणार आहे.
भारताचे स्थान
आयएमएफच्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये भारताची अर्थव्यस्था 8 टक्क्यांनी घसरणार असल्याचा अंदाज होता. चीन 2.3 टक्क्यांच्या वृद्धीदरासोबत एकमेव सर्वात मोठा देश राहणार असल्याचे संकेत होते. परंतु या अंकात सुधारणा करुन भारत 2022 मध्ये 6.8 टक्क्यांची वृद्धी प्राप्त करणार असल्याचा अंदाज बांधला आहे.









