चिनी सैन्यात बदल : जपानच्या संरक्षण मंत्रालयाचा अहवाल
वृत्तसंस्था/ टोकियो
भारतीय सैन्याने पायदळाप्रकरणी चीनला मागे टाकले आहे. चीन आता पायदळाप्रकरणी तिसऱया स्थानावर पोहोचला आहे. यादीत दुसऱया क्रमांकावर उत्तर कोरियाचे सैन्य आहे. चीन आणि पाकिस्तान या दोन आघाडय़ांवर धोका असणाऱया भारताच्या पायदळातील सैनिकांची संख्या वाढून 12 लाख 40 हजारांवर पोहोचली आहे.
जपानच्या संरक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार उत्तर कोरियाच्या सैनिकांची संख्या 11 लाख तर चीनच्या सैनिकांची संख्या 9 लाख 80 हजारांवर पोहोचली आहे. चीन सध्या स्वतःच्या सैन्याला अधिक घातक स्वरुप देण्यासाठी व्यापक स्तरावर सुधारणा घडवून आणत आहे.
3 लाख सैनिकांची कपात
चीनने सैन्यासाठी थिएटर कमांड संरचना लागू केली असून याकरता 3 लाख सैनिकांची कपात करण्यात आली आहे. चीनने सैन्याला 5 थिएटर्समध्ये विभागले आहे. चीनच्या सैन्याने रॉकेट फोर्स, स्टॅटेजिक सपोर्ट फोर्स, लॉजिस्टिक सपोर्ट फोर्स यांची निर्मिती केली आहे. चीन अत्यंत वेगाने संख्या आणि गुणवत्ता दोन्हींच्या दृष्टीने सुधारणा करू पाहत आहे. अण्वस्त्रs, क्षेपणास्त्रs, नौदल आणि वायुदलावर चीनचा भर आहे. चीन आता अंतराळ, सायबर आणि लेझर अस्त्रांवर अधिक बळ देत आहे.
भारतात अनेक प्रश्न
चीनला लागून असलेल्या भारतीय सीमेचा मुद्दा अद्याप निकालात निघालेला नाही. भारतात अनेक जातीय, धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक गट असून नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे चिंता निर्माण झाली आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर इस्लामिक दहशतवादाचा मुद्दा चिंतेत भर करणारा आहे. भारत सातत्याने सैन्याला आधुनिक स्वरुप देत आहे. भारत अमेरिका आणि रशियाकडून शस्त्रास्त्रखरेदी करत असल्याचे म्हटले गेले आहे.
भारताचा मोठा प्रभाव
1.3 अब्ज लोकसंख्या असलेल्या भारताचा दक्षिण आशियात विशेष प्रभाव आहे. हिंदी महासागराच्या मध्यस्थानी असलेल्या भारताची सामरिक स्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. आशिया आणि प्रशांत महासागराला जोडणाऱया व्यापारी मार्गावर भारताचे स्थान आहे. भारताने या क्षेत्रातील स्वतःची स्थिती बळकट केली असून जग त्याच्याकडे अपेक्षापूर्ण नजरेने पाहत असल्याचे जपानच्या अहवालात म्हटले गेले आहे.