प्रतिनिधी / चंदगड
चंदगड अर्बन निधी (बँक) च्या माध्यमातून चंदगड तालुक्मयातील ठेवीदारांना लाखो रूपयांचा गंडा घालणाऱया संशयित विठ्ठल पेडणेकर याने पुणे शाखेतही ठेवीदारांना ‘चुना’ लावल्याचे वृत्त झळकताच चंदगड तालुक्मयात लोकांनी संताप व्यक्त केला. बेळगाव-वेंगुर्ले रस्त्यावरील आरटीओ नाक्मयावरील त्याचा फ्लेक्स लोकांनी फाडून टाकला.
विठ्ठल पेडणेकर हा चंदगड तालुक्मयातील पोर्ले गावचा असून, चंदगड तालुक्मयाच्या गोरगरीबांचा तारणहार असल्याचे भासवत लोकांना लुटले. सुलभ व्याजावर कर्जे आणि सबशिडीवर ट्रक्टर मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोटय़वधींची माया जमविली. सबशिडीवर ट्रक्टर देतो म्हणून गडहिंग्लज तालुक्मयातील डोणेवाडी गावच्या जयसिंग पाटील या तरुणाने त्याच्याकडे 3 लाख 80 हजार रूपये दिले. त्याला ना ट्रक्टर दिला ना पैसे. पाटणे फाटय़ावरील विठ्ठल पेडणेकरच्या कार्यालयासमोर त्या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. सदोषवधाच्या गुन्हय़ातून सध्या तो जामिनावर असून, पुणे येथे चंदगड निधी (बँक) सुरू करून तिथेही 7 कोटीला गंडा घातल्याचे वृत्त प्रसिध्द झाले आहे. चंदगड अर्बन बँकेच्या वलयाचा लाभ उठविण्याच्या हेतूने चंदगड अर्बन (निधी) बँक असे नाव आपल्या संस्थेला दिले. त्याच्या या संस्थेशी आपला कोणताही संबंध नाही वा पुणे येथे आपली शाखा नसल्याचा खुलासा चंदगड अर्बन को-ऑप. बँकेने केला आहे. गोरगरीबांना फसविणाऱया विठ्ठल पेडणेकरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चंदगड तालुक्मयातून होत आहे.









