वार्ताहर / कुंभोज
भादोले ता. हातकणंगले येथे आज काही नागरिकांना एका आघोरी प्रकार स्मशानभूमीत निदर्शनास आला, सदर प्रकारामुळे मयत विधीस उपस्थित असलेल्या नागरिकांच्यात अघोरी विद्या याविषयी मोठी चर्चा रंगली. परिणामी एका बाजूला देश विकासात्मक शतकाकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे मात्र अशा पद्धतीच्या अघोरी विद्या करुन नागरिकांची मोठ्या प्रमाणात भोदुबाबा फसवणूक करतात व सर्वसामान्य नागरिका फसवणूक बळी पडतो.
भादोले येथे रक्षाविसर्जन कार्यक्रमासाठी गेलेल्या काही नागरिकांना आगळावेगळा प्रकार दिसून आला आहे. रक्षाविसर्जनावेळी नारळाला काळे दोरे बांधून त्यावरती काही महिला पुरुषांचे फोटो लावून फोटोवर दाबन घुसल्याचे प्रकार आढळून आला. तसेच नारळावरती गुलाल टाकून काही नारळावर युवक-युवतींची नावेही लिहुन नारळ फोडले होते, परिणामी हा अघोरी प्रकार स्मशानभुमीत उपस्थित नागरिकांना लक्षात आल्याने रक्षाविसर्जन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले हातकणगले तालुका भाजपचे उपाध्यक्ष पुंडलीक बिरंजे यांनी या प्रकारावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावर बोलताना बिरंजे यांनी नागरिकांनी अंधश्रद्धेचा बळी न पडता श्रद्धा व अंधश्रद्धा यामधील अंतर समजुन घेणे गरजेचे आहे. तसेच अशा पद्धतीच्या फसवणूक व अघोरी विद्या करणाऱ्या मांत्रिकांचावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी पुरोगामी महाराष्ट्रातील खेडेगावात अशा घटना भोंदूगिरी लोक घडवत आहेत आणि यातूनच लोकांची फसवणूक करून मोठी माया जमवत आहेत ,हे एक प्रथम दर्शनी उदाहरण असले तरी असे प्रकार सर्वत्र घडत आहेत अशा गोष्टीचा निषेध करावा तितका थोडा आहे. असे मत पुडंलीक बिरंजे यांनी मांडले.