प्रतिनिधी / पेठ वडगाव
भादोले ता.हातकणंगले गावात कोरोना बाधितांची संख्या आत्तापर्यंत धरा झाली असून अजूनही काही चाचणी रिपोर्ट प्रलंबित आहेत. भादोलेसारख्या ग्रामीण भागात कोरोनाबाधीतांचा वाढत चाललेल्या रुग्णामुळे भादोले गाव समूह संसर्ग झाल्याची भीती व्यक्त होत असूनहे गाव कोरोना हॉटस्पॉट बनण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. भादोले ग्रामस्थांनी ही बाब गांभीर्याने घेवून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी अत्यंत खबरदारी घेण्याची गरज आहे.
हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात आत्तापर्यंत तब्बल पंधरा कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामुळे गावात समूह संसर्ग झाल्याची भीती व्यक्त होत आहे. एका डॉक्टरलाच कोरोना झाला तर एका डॉक्टरला दोन वेळा क्वारंटाइन व्हावे लागले. कोरोना संसर्गाच्या भीतीने गावात अनेक खाजगी दवाखाने सध्या बंद असल्याचे चित्र आहे. गावातील दोन संस्थांचे सचिव कोरोनाबाधित झाले आहेत्त. नागरिकांनी कोरोनाची लक्षणे जाणवल्यास गांभीर्याने घ्यावे. सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास जाणवल्यास तात्काळ भादोलेतील आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी व उपचार घेणे गरजेचे आहे. विविध दुकाने, बँका, संस्था, दुध डेअरीमध्ये कोरोना संसर्ग होवू नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
गावात ग्रामपंचायत प्रशासन विविध पातळ्यावर दक्षता, जनजागृती करत असून खबरदारी घेत आहे मात्र नागरिकांनी विविध स्वयंशिस्त पाळून कोरोना संसर्गापासून दूर राहण्याची व गावात कोरोना संसर्ग पसरू नये यासाठी दक्ष राहण्याची गरज व्यक्त आहे तर जिल्हा प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत प्रशासन यांना भेट देवून मार्गदर्शन करण्याची गरज आहे.भादोले गावात सध्याची दिवसागणिक कोरोना रुग्णांची वाढत चाललेली संख्या पाहता गाव कोरोना हॉटस्पॉट बनण्याची भीती व्यक्त होत आहे. कोरोना रुग्णांची वाढत चाललेली संख्या संख्या पाहता घर टू घर सर्व्हे करून आरोग्य तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे. तर नागरिक व व्यापारी- व्यावसाईक, शेतकरी यांनी सामाजिक अंतर पाळून खबरदारी घेण्याबाबत ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राने गांभीर्याने जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








