पेठ वडगाव / प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील भादोलेच्या वयोवृद्ध शेतकऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. विश्वास यशवंत पाटील असे 83 वर्षीय मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विहिरीच्या पाण्यात तोल जावून पडल्याने बुडून मृत्यू झाला. घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.
या बाबत पोलिसातून घेतलेली माहिती अशी, भादोले येथील खोडवे मळा येथे विश्वास पाटील यांची शेतात विहीर आहे. या विहिरीत सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विश्वास पाटील हे शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला पाणी घालण्यासाठी बादली घेवून विहिरीवर गेले होते.
यावेळी विहिरीत पायऱ्यावरून उतरत असताना त्यांचा पाय घसरून विहिरीत बुडाले. बराच वेळ ते घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची शेताकडे शोधाशोध करण्यासाठी आले. यावेळी विहिरीच्या पाण्यात त्यांचा टावेल, टोपी विहिरीच्या पाण्यावर तरंगताना तर चप्पल विहिरीच्या काठावर दिसून आले. यामुळे विहिरीच्या पाण्यात ते बुडाले असावेत असा अंदाज आला असता गावातील लोकांना या विहिरीवर बोलवून घेतले. वडगाव पोलिसांना या घटनेची वर्दी देण्यात आली. विहिरीत ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम पाटील व शिगावचे पाणबुडी, वडगाव पोलीस, ग्रामस्थ यांनी शोध घेतला. सायंकाळी तब्बल पाच तासाच्या प्रयत्नांनी मृतदेहाचा शोध लागला.
घटनास्थळी वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विजय गुरव, पो.कॉ. कृष्णात पाटील यांनी पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन सावर्डे ग्रामीण रुग्णालयात करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली असून अधिक तपास हवालदार गुरव करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









