पेठ वडगाव / प्रतिनिधी
कोरोना काळातील वीज बिल माफ व्हावे व उर्वरित वीज बिल भरण्यासाठी लोकांना मुदत द्यावी. या मागणीसाठी भादोले ग्रामस्थ आक्रमक झाले. यावेळी वीज कनेक्शन खंडीत करण्यास सांगणार्या सहाय्यक अभियंता शरदकुमार संकपाळ यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले.
भादोले येथे गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊन काळातील वीज बिले थकीत ठेवणार्या ग्राहकांची वीज कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई सुरु केली होती. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात धाव घेवून शरदकुमार संकपाळ यांना धारेवर धरले.
घरगुती, व्यावसाईक व शेतीची बिले भरण्यास मुदत द्यावी व कोरोना काळातील वीज बिले माफ व्हावी या मागणीसाठी धारेवर धरले. भादोले ग्रामस्थांना जाचक अटीच्या आधारे वीज कनेक्शन बंद केल्यास महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी विवेक पाटील यांनी दिला.
यावेळी शंकर पाटील, प्रदीप पाटील, विवेक पाटील, कपील पाटील, कुमार पाटील, राहुल पाटील, प्रवीण घोरपडे, समीर सनदे, जोतीराम पाटील, गणेश हुजरे, संकेत पाटील, नितीन बनसोडे, ऋषी कमलाकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.