पेठ वडगाव / प्रतिनिधी
भादोले (ता.हातकणंगले) येथे मुलाचे भांडण लागल्याचे खोटे सांगून मोटरसायकलवरून नेवून निर्जन ठिकाणी नेवून कोयत्याचा धाक दाखवून अंगावरील साडे तीन तोळ्याचे सुमारे पावणे दोन लाख रुपये किमतीचे दागिण्याची लुट करण्यात आली. या चोरट्यास वडगाव पोलिसांनी सापळा लावून पकडले. या चोरट्याने चोरीची कबुली पोलिसांना दिली आहे.
या बाबत पोलीसातून घेतलेली माहिती अशी की, भादोले (ता.हातकणंगले) येथील रावण पाटील याने गावातील इंदुबाई तुकाराम पाटील या महिलेच्या घरी जावून त्यांच्या मुलगा दादासो याचे भांडण झाले असून भांडणात त्याचे डोक्याला लागले असल्याचे खोटे सांगितले व मोटारसायकल वरून चला असे सांगितले. भीतीने ही महिला रावण याच्या मोटारसायकलवर बसून गुलाबराव यांच्या इनामी शेतीच्या दिशेने गेल्या. या निर्जन ठिकाणी गेल्यानंतर मोटारसायकल थांबवून रावण याने आपल्या जवळ असलेला कोयता काढून महिलेच्या गळ्याला लावला. खिशातील कापडाने महिलेच्या गळ्याला आवळून त्यांच्या अंगावरील सोन्याची माळ, मंगळसूत्र, गंठण असे सुमारे पावणे दोन लाख रुपये किंमतीचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले.
दागिने काढून घेतल्याचे कोणाला सांगितले तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देवून मोटारसायकल वरून तेथून निघून गेला. घाबरलेल्या अवस्थेत या महिलेने घरी येवून नातेवाईकांना घडला प्रकार सांगितला. नातेवाईकांनी या महिलेला वडगाव पोलीस ठाण्यात घेवून येवून तक्रार दाखल केली.
वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निशानदार यांनी तात्काळ तपासाची सूत्रे गतिमान करून रावण पाटील याला सापळा लावून भादोले येथून अटक केली. या चोरट्याने चोरीची कबुली दिली असून त्याचेकडून मुद्देमाल कोठे ठेवला आहे याची चौकशी पोलीस करत आहेत. या चोरट्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









