प्रतिनिधी / पेठ वडगाव
भादोले (ता.हातकणंगले) येथे मुंबईहून आलेल्या एका महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला. या महिलेला सध्या अतिग्रे येथे अलगीकरण केंद्रात अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या तिच्या एका नातेवाईकास कोरोन्टाइन करण्यात आले आहे.
भादोले येथे मुंबईहून नातेवाईकाकडे एक महिला गेल्या तीन दिवसापूर्वी आली होती. या महिलेला किणी टोल नाक्यावर अतिग्रे अलगीकरण केंद्रामध्ये स्वॅब देण्यास सांगण्यात आले होते. ही महिला किणी टोल नाक्यावरून भादोले येथे नातेवाईकांकडे जावून तेथून अतिग्रे येथे अलगीकरण केंद्रात तीन दिवसापूर्वीच गेली. या महिलेची कोरोना चाचणी आज पॉझिटीव्ह आली. या महिलेच्या संपर्कात आलेल्या तिच्या भादोलेतील एका नातेवाईकाला कोरोन्टाइन करण्यात आले आहे. भादोले ग्रामस्थांनी आपल्या परगावाहून येणार्या नातेवाईकांना घरी बोलावून अलगीकरण केंद्राकडे पाठवू नये. किणी टोल नाक्यावरून अथवा अन्य ठिकाणी सूचना दिलेल्या तपासणी नाक्याच्या ठिकाणावरून थेट स्वॅब तपासणी व अलगीकरणासाठी जाण्यास सांगण्यात यावे असे आवाहन भादोले सरपंच आनंदराव कोळी यांनी केले आहे. या पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णामुळे भादोलेत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या तीन झाली आहे. ग्रामस्थांनी कोरोना संसर्ग वाढू नये याबाबत खबरदारी घ्यावी. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Previous Articleदुचाकी चोरणाऱया त्रिकुटाला अटक
Next Article रत्नागिरी : एका दिवसात कोरोनाचे चार बळी









