प्रतिनिधी / लांजा
भात पिकाला हेक्टरी 25 हजार रुपये कोकणात नुकसान भरपाई मिळण्याची मागणी लांजातील सरपंच संघटनेने मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. मंगळवारी लांजा तालुका सरपंच संघटनेच्यावतीने करण्यात आली. लांजा तहसीलदार पोपट ओमसे यांना निवेदन सादर केले आहे.
पीक विमा योजनेतील जाचक अटी शिथिल करण्यात यावी अशी मागणी करून सरसकट भात पिकाचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
यावेळी वाकेड संदीप सावंत, शिपोशी सरपंच हरेश जाधव, कुरुचुंब चे प्रसाद माने, मठच्या साळवी, उपळे सरपंच वीर आदी पदाधिकारी सरपंच उपस्थित होते. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानी बाबत बोलातना संजय पाटोळे यांनी सांगितले की,” 2015 च्या शासन जीआर प्रमाणे भाताला केवळ हेक्टरी 6800 रुपये नुकसान भरपाई आहे.
गुंठे ला 68 रुपये आहे.1 ते 14 गुंठे ला 1000 रुपये शेतकयांना मिळतात. हा निश्चित दरतुटपुंजी आहे. कोकणात हेक्टरी 25, 000 रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी भात पीक नुकसान दर वाढवून मिळावा. यावेळी नूतन तहसीलदार ओमसे याचे सरपंच संघटना वतीने स्वागत करण्यात आले.
Previous Articleबॅकांना एटीएम कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करण्याचा पडला विसर
Next Article चिपळूण : पोलिसांनी जप्त केला देशी-विदेशी मद्य साठा









