10 जणांविरूद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरालगतच्या भाटीमिऱया बागकरवाडी येथे किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी झाल़ी यामध्ये दोन्ही बाजूकडील 5 जण जखमी झाले असून परस्परविरोधी तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आह़े त्यानुसार पोलिसांनी 10 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आह़े
कुणाल जयानंद नार्वेकर (27, ऱा बागकरवाडी भाटीमिऱया) व सूर्यकांत रविकांत रांदपकर (36, ऱा बागकरवाडी भाटीमिऱया) यांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली आह़े कुणाल याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सूर्यकांत हे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दत्त मंदिर येथून कुत्र्याला घेवून पायी जात होत़े यावेळी त्याच रस्त्याने तक्रारदार कुणाल यांचे वडील जात होत़े पूर्वीचा राग मनात ठेवून सूर्यकांत यांनी वडिलांच्या अंगावर कुत्रा सोडला. यामुळे ते रस्त्यावर कोसळले, असा समज कुणाल यांचा झाला होत़ा या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी कुणाल हे गेले असता संशयित आरोपी सूर्यकांत रविकांत रांदपकर, प्रसाद प्रवीण मयेकर (36), प्रवीण जयदेव मयेकर (60), प्रियेश प्रवीण मयेकर (30), संतोषी सूर्यकांत रांदपकर (35,ऱा सर्व बागकरवाडी, भाटीमिऱया) यांनी मारहाण व शिवीगाळ केली, अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आह़े
तर सूर्यकांत यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, जमिनीचा वाद मनात ठेवून शुक्रवारी रात्री जयेश उर्फ जयानंद घनश्याम नार्वेकर (60), स्मित उर्फ सुमित सुभाष नार्वेकर (27), सुदेश सुरेश नार्वेकर (45), महेश सुरेश नार्वेकर (35), ऋषीकेश विलास नार्वेकर (36, ऱा सर्व बागकरवाडी भाटीमिऱया) यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली.









