प्रतिनिधी /बेळगाव
शहरात विविध ठिकाणी भाजी मार्केट असून नंरगुदकर भावे चौकातील भाजी मार्केटमध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहे. येथील भाजी विपेत्यांसाठी बसण्यासाठी कट्टा तसेच ऊन -पावसापासून बजावासाठी छत उभारण्याचा प्रस्ताव आहे. सदर काम महापालिकेच्यावतीने लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
नरगुंदकर भावे चौकात महत्त्वाचे भाजी मार्केट आहे. पण शिस्त आणि आवश्यक सुविधांअभावी वाहनधारक, ग्राहक आणि भाजी विपेत्यांना त्रास होत आहे. त्यामुळे सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. नरगुंदकर भावे चौकातील रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने तसेच ज्याठिकाणी जागा मिळेल तिथे वाहनधारक दुचाकी आणि तिनचाकी वाहने पार्क करीत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. संपुर्ण चौकात भाजी विक्रेते, फेरीवाले, प्रवासी रिक्षा आणि दुचाकी वाहनाची गर्दी रोज होत असते. त्यामुळे या परिसरातील व्यावसायिकांना शिस्त लावण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे.
नरगुंदकर भावे चौकात भाजी विपेते बसत असलेल्या ठिकाणी कट्टा निर्माण करण्यात येणार असून त्यावर छत निर्माण करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या जीवनोपाय योजने अंतर्गत विविध सुविधा उपलब्ध करणे आवश्यक असल्याने भाजी विपेत्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.









