रोहतास
बिहार शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर केला आहे. यंदाच्या दहावीच्या निकालात मुलांनी बाजी मारली आहे. रोहतास येथील जनता हायस्कुलचा हिमांशू राज राज्यात पहिला आला आहे. हिमांशूने 96.20 टक्के गुण प्राप्त केले आहेत. त्याला 481 गुण प्राप्त झाले आहेत. घरात दररोज 14 तास अभ्यास करून राज्यात पहिल्या आलेल्या हिमांशूला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचे आहे.
वडिल खंडावर जमीन घेत शेती करतात. अनेकदा शिक्षणादरम्यान आर्थिक स्थिती बिकट झाल्याने मोठा त्रास झाला, परंतु शिक्षण सुरूच ठेवले. बाजारात भाजी विकण्यास वडिलांना अनेकदा मदत केली. शेती तसेच घरातील कामांना मदत करण्यासह अभ्यासही सुरुच ठेवल्याने राज्यात पहिला येऊ शकलो, असे हिमांशूने म्हटले आहे. बिहारमधील दहावीच्या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थी दीर्घकाळापासून करत होते. पहिल्यांदाच हा निकाल शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.









