प्रतिनिधी/इस्लामपूर
भारतीय जनता युवामोर्चा महाराष्ट्र प्रदेश सहकार विभाग संयोजक पदी व सातारा जिल्हा भाजयुमोच्या प्रभारी पदी राहुल महाडिक यांची निवड करण्यात आली. मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवामोर्चा राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत त्यांच्यावर पक्षाने आणखी नव्याने जबाबदारी टाकली आहे.
काही महिन्यापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाडीक यांची भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली होती. या निवडीनंतर महाडीक यांनी युवकांचे संघटन करण्यावर अधिक भर दिला. याची दखल घेत भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सहकार विभाग संयोजक पदी व सातारा जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा प्रभारी पदी निवड केली.
भाजयुमोच्या प्रदेश सचिवपदी जयराज पाटील
भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी कामेरीचे जयराज चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली.काही दिवसांपूर्वी पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या या निवडीने त्याच्या समर्थकातून आनंद व्यक्त होत आहे.








