नवी दिल्ली प्रतिनिधी
देशात सातत्याने सुरू असलेल्या इंधन दर वाढीमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. दररोज होणाऱ्या इंधन दर वाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. देशात इंधन दर वाढीवर आंदोलन देखील झाली. कच्च्या तेलाचे भाव कमी असतानाही देशात पेट्रेल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
”ज्या दिवशी डिझेल-पेट्रोलच्या दरात वाढ होणार नाही त्या दिवशी भाजप सरकारला आठवड्यातील त्या दिवसाचं नाव ‘अच्छा दिन’ करायला हवं. कारण वाढत्या महागाईच्या काळात अन्य दिवस तर सर्वसामान्यांसाठी ‘महंगे दिन’ आहेत.” असं प्रियंका गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.









