नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरातील शोपियान येथे भाजप समर्थक सरपंचाची हत्या पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांकडून करण्यात आली आहे. या सरपंचाचे नाव निस्सार अहमद भट असे आहे. ते गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार सादर करण्यात आली होती. गेल्या चार महिन्यातील भाजप समर्थक सरपंचाची ही तिसरी हत्या आहे. दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱयात भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्यात वाढ केली आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात दोन भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आले होते. भट यांच्या हत्येची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.









