ऑनलाईन टीम
संभाजी ब्रिगेडने आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. यासाठी भाजपासोबत जाण्याचा पर्याय योग्य असल्याचं मत संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केलं आहे. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडकडून संयुक्तरित्या प्रकाशित होणाऱ्या मराठा मार्ग या मासिकात पुरुषोत्तम खेडेकर यांनी आगामी काळात राजकीय वाटचाल करताना भाजपसोबत युती करण्याची भूमिका मांडली आहे. यावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.
पुरुषोत्तम खेडेकर यांच्याकडून अशाप्रकारचा कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर आमची कोअर कमिटी निर्णय घेईल. असा काही प्रस्ताव असेल तर तो राज्याच्या प्रदेशाध्यक्षांकडेच यायला हवा. आमचा पक्ष हा जगभर पसरलेला आहे. त्यामुळे इतक्या सहजपणे हे निर्णय होत नाहीत. असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
तर, पुरोषत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून स्वबळावर लढण्याचे प्रयत्न केले पण त्याला काही यश आले नसल्याचे सांगत, राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने करण्यासाठी जो पर्याय उपलब्ध आहे तो भाजपाचा आहे. त्यानुसार संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी तो पर्याय तपासून बघावा आणि दोघांच्या एकमतावर राजकारण करावं ही संकल्पना असल्याचे म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








