बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य सरकार आणि पक्षाविषयी जनमत नकारात्मक आहे, हे चांगल नाही, असे भाजपचे विधान परिषद आमदार ए. एच. विश्वनाथ यांनी म्हंटले आहे. तसेच येडियुरप्पांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक करावी असे त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान भाजपचे प्रदेश प्रभारी अरुण सिंग हे कर्नाटक दौऱ्यावर आहेत. आज अरुण सिंग यांनी बेंगळूर येथे आमदार आणि मंत्री यांची बैठक घेतली.
दरम्यान, आमदार ए. एच. विश्वनाथ यांनी राज्याच्या प्रभारींसमोर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे वय, आरोग्य पाहता ते मुख्यमंत्रिपदी राहून सक्षमपणे सरकार चालवतील असे वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी दुसर्या व्यक्तीची नियुक्ती करावी, असे त्यांनी म्हंटले. तसेच कौटुंबिक हस्तक्षेप सर्वात वाईट होत असल्याचेही ते म्हणाले. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार ए. एच. विश्वनाथ यांनी सर्व मुद्द्यावर मी अरुणसिंग यांच्याशी बोललो असल्याचे सांगत त्यांनी ही माहिती दिली.









