आयटीडीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱया भारतीय पर्यटन विकास महामंडळाच्या (आयटीडीसी) अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी संबित पात्रा हे ओएनजीसीचे स्वतंत्र संचालक राहिले आहेत.
नियुक्ती विभागाने पर्यटन मंत्रालयासंबंधी काही मोठे निर्णय घेतले आहेत. भारतीय पर्यटन विकास महामंडळाचा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकाच्या पदाला वेगवेगळे करण्यात आले आहे. इंडिया टूरिजम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये अध्यक्ष आणि व्यवस्थापीय संचालक अशी दोन पदे असणार आहेत.
पात्रा यांना आयटीडीसीचे अध्यक्ष आणि पार्ट टाइम बिगरकार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. तर गंजी कमला व्ही. राव आयटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर पुढील आदेशापर्यंत नियुक्त असतील.









