मुंबई/प्रतिनिधी
राज्यात अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही करोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे यांनी स्वत: ट्विट करत आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती दिली आहे. पंकजा मुंडे यांनी कोरोना संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असल्याने आपल्यालाही कोरोना संसर्ग झाला असल्याची शक्यता पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे यांनी यावेळी आपल्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान याआधी पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. उपचारांनंतर धनंजय मुंडे कोरोनातून बरे झाले.
पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये , “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी आधीच काळजी घेत असून विलगीकरणात आहे. मी अनेक लोकांना तसंच कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून त्याद्वारे संसर्ग झाला असावा. माझ्यासोबत जे होते त्यांनी देखील चाचणी करुन घ्या..काळजी घ्या”. असे म्हंटले आहे.