कोलकाता / वृत्तसंस्था
ममता बॅनर्जींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकाविण्यास प्रारंभ केला आहे, अशी तक्रार पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांनी केली आहे. ममता बॅनर्जी जाहीर सभांमधून धमक्या देत आहेत. यामुळे राज्यात हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. बॅनर्जी यांच्या उघड धमक्यांमुळे तृणमूल कार्यकर्त्यांना चेव आला असून त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करावयास प्रारंभ केला आहे, असे भाजपने आपल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे. तर भाजपकडून मोठय़ा प्रमाणात मोठय़ा रकमांची मतदारांना लाच दिली जात आहे, अशी तक्रार तृणमूलने केली आहे.
एकादा केंद्रीय सुरक्षा दले राज्याबाहेर गेली की आम्ही बघून घेऊ अशी धमकी ममता बॅनर्जी जाहीर सभांमधून देत आहेत. यावर निवडणूक आयोगाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी भाजपने आपल्या तक्रारीत केली आहे.









