ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत भारतीयांचे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये वाचवले, असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बँकेच्या खातेदारांची गोपनीय माहिती (डेटा) चोरुन विक्री करण्याचा प्रयत्न सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी हाणून पाडला आहे. यामध्ये अभिनेते रवींद्र मंकणी यांचे सुपुत्र रोहन मंकणी यांचाही समावेश आहे.
डेटा खरेदीवेळी 25 लाख रुपये घेताना 10 जणांना अटक करण्यात आली. भाजपच्या चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणी यांच्यासह दहा जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक झाली आहे. यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांनी 25 लाख रुपये स्वीकारताना 10 जणांना अटक केली असून अन्य काही जणांची चौघांची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी चौघे जण नामांकित कंपन्यांमध्ये संगणक अभियंते म्हणून कार्यरत आहेत.








