बेंगळूर/प्रतिनिधी
अश्लील व्हिडिओ प्रकरणात अडकलेले भाजपचे आमदार रमेश जारकिहोळी आणखी अडचणी येण्याची शक्यता आहे. अश्लील व्हिडिओमुळे जारकिहोळी यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान या तरुणीने काही दिवसापूर्वी तिसरा व्हिडिओ व्हायरल करत आपल्याला आणि कुटुंबियांना सुरक्षा दिल्यास आपण एसआयटी समोर हजर राहण्यास तयार असल्याचे म्हंटले होते. आत या प्रकरणातील तरुणीने जारकीहोळी यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे आपल्याला संरक्षण मिळावे, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली आहे. जारकीहोळी यांनी आपल्यासह कुटूंबाला धमकावल्याचा आरोप या तरूणीने केला आहे.
जारकीहोळी यांच्या या प्रकरणामुळे कर्नाटकमधील भाजपच्या बी. एस. येडियुरप्पा सरकारसमोर नवे संकट उभं राहील आहे. विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेस या प्रकरणानंतर आक्रमक झाली असून त्यांनी जारकिहोळी यांना अटक करण्याची मागणी लावून धरली आहे. तर तरुणाने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ जारी केला होता. ”ते मला व माझ्या कुटुंबाला ठार मारू शकतात. मी जारकिहोळी यांच्याकडून सुरू असलेल्या छळामुळे त्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करणार आहे”, असे तिने या व्हिडिओमध्ये म्हटले होते.
नंतर या तरूणीने आता कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जारकिहोळी माझी कुठेही आणि कधीही हत्या करू शकतात. तसेच या प्रकरणातील ते प्रत्येक पुरावाही ते नष्ट करतील. प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेली एसआयटीही त्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहे. माझ्या कुटूंबावरही दबाव टाकला जात आहे. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेऊन राज्य सरकारला मला संरक्षण देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी तरूणीने केली आहे. तरूणीच्या या मागणीमुळे जारकिहोळी आणखी अडचणी येण्याची शक्यता आहे.
व्हिडिओत काय म्हणाली तरूणी?
मी आणि माझ्या कुटुंबीयांत झालेल्या संभाषणाची सीडी २ मार्चला जाहीर करण्यात आली. याचा मला धक्का बसला आहे. काय करावे हेच मला कळत नाही. कुठे जावे हे मला सुचत नाही. मी माझ्या ओळखीच्या एका प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला. परंतु, त्याने काहीही करण्यास नकार दिला. त्याने मला काँग्रेसमधील सिद्धरामय्या आणि डी.के.शिवकुमार यांच्यासारख्या नेत्यांची मदत घेण्याचा सल्ला दिला. यानंतर मी शिवकुमार यांच्या निवासस्थानी गेले परंतु, ते घरी नव्हते. माझ्या कुटुंबीयांनी पोलिसांनी बेंगळूरमध्ये आणून त्यांना सरंक्षण द्यावे, असे त्या तरुणीने म्हटले आहे.
जारकिहोळी यांनी एका तरुणीसोबत केलेले अश्लील चाळ्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. जारकिहोळी यांनी धमकावून लैंगिक छळ केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर कर्नाटकमध्ये खळबळ उडाली. कर्नाटकातील राजकारणामध्ये अशी सेक्स स्कँडल नवीन नाहीत. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.









