ऑनलाईन टीम / पणजी
तृणमूल काँग्रेतच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सद्या गोवा दौऱ्यावर आहेत. आज त्यांचा या दौऱ्याचा अखेरचा दिवस आहे. यावेळी त्यांनी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या कारभारवर बोट ठेवेले आहे. देशात भाजप बळकटीला राष्ट्रीय काँग्रेसच जबाबदार आहे कारण काँग्रेस राजकारणाबाबत गंभीर नाही असे काँग्रेसवर जोरदार टीका करत ममता बॅनर्जींनी सांगितले. यावेळी ममता बॅनर्जी यांनी गोवा युतीबद्दल निर्णय न घेतल्याचा आरोपही काँग्रेसवर केला आहे. पणजीत बोलताना ममता म्हणाल्या की, काँग्रेस निर्णय घेत नाहीये आणि त्याचेच परिणाम आज देश भोगत आहे. असे ही त्या म्हणाल्या.
यावेळी ममतांनी तृणमूल गोव्यातील सर्वच्या सर्व ४० जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजपवर ही सडकून टीका केली. भाजपने देशास अच्छे दिन येणार असं आश्वासन दिले होते. मात्र हेच भाजप देशाच्या विनाशासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात डिझेल, पेट्रोल, एलपीजी सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे सामान्यांचे अर्थिक गणित बिघडले आहे. जीएसटीमुळे व्यापाराला फटका बसत आहे. पण भाजपा या मुद्द्यांकडे गांभीर्याने पाहत नाही. असे ही यावेऴी ममता म्हणाल्या.