बांदा/प्रतिनिधी-
बांदा ,इन्सुली , शेर्ले आणि परिसराला शुक्रवारी अतिवृष्टीमुळे पुराचा फार मोठा तडाखा बसला होता . सर्वसामान्य लोकांच्या घरात पाणी घुसल्याने त्याच्या जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या होत्या अश्या सुमारे 300 कुटुंबाना भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा बांदा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांच्या पुढाकारातून विविध ट्रस्ट च्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू आणि 400 पाणी पिण्याचे बॉक्स देऊन मदतीचा हात देण्यात आला परिसरातील कोसळलेल्या अस्मानी संकटामुळे सर्वसामान्य कुटुंबासमोर उपासमारीची वेळ आली होती या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत या कुटुंबाना मदतीचा हात दिला . बांदा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी स्वतः व आयशाबी ट्रस्ट , आजरा चंदगड ट्रस्ट ,जमित उलमा यांच्या माध्यमातून या भागातील 300 कुटुंबाना जीवनावश्यक धान्य बॅग व 400 बॉक्स पिण्याचे पाणी वाटप केले . यापुढे कोणीही गरजू असतील त्याना हि मदत केली जाईल









