प्रतिनिधी/ वडूज
कमी रासायनिक व नैसर्गिक सेंद्रिय अन्नधान्य आरोग्यासाठी उत्तम असून भाजप व मित्र पक्षांचे सरकार येईल त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे ओळख ही सेंद्रिय, विषमुक्त अन्न पिकवणारे राज्य म्हणून ओळख निर्माण करू असे प्रतिपादन माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जाखणगाव येथे केले
जाखणगाव (ता खटाव ) येथील येस सेंद्रिय शेतकरी गट प्रोजेक्टला सदाभाऊ खोत यांनी भेट दिली. कृषी विभाग गटशेती योजने अंतर्गत राबवले गेलेले 60 टक्के अनुदानातील औजार बँक ,शेततळे, ट्रेनिंग हॉल ,ऑरगॅनिक फर्टीलायझर निर्मिती युनिट, गाय गोटा, पॅक हाऊस, सोलर युनिट या कामांची पाहणी सदाभाऊ खोत यांनी केली यावेळी संस्थापक संजय भगत, सचिव अरुण विधाते ,संचालक बाळुताई जगताप , अध्यक्ष राजेंद्र भगत, सोसायटी अध्यक्ष सोमनाथ रणनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
येस सेंद्रिय शेतकरी गटाने सेंद्रिय खते औषधे निर्मिती व बीजोत्पादन उपक्रम राबवून परिसरातील शेतकयांना एका वेगळ्या वळणावर आणले आहे नैसर्गिक व सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे ज्यादा रासायनिक भाजीपाला फळे खाण्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे ही शोकांतिका आहे जर चांगले आरोग्य पाहिजे असेल तर सेंद्रिय, नैसर्गिक ,कमी रासायनिक अन्नधान्य खाणे हाच लोकांच्या पुढे पर्याय आहे कॅन्सर सारख्या भयावह आजाराने निर्व्यसनी व वारकरी संप्रदायातील माझ्या वडिलांचा बळी घेतला .येस सेंद्रिय शेतकरी गटाने निर्मिती केलेल्या स्लरी आर्क, गांडूळ खत, वर्मी वॉश आदी सेंद्रिय खत निर्मितीचा शेतकयांनी सभासदांनी लाभ घ्यावा असेही मा .सदाभाऊ म्हणाले
येस सेंद्रिय गटाने
ख्अ 726 सारखे शेतकयांना अधिकचे उत्पन्न देणारी व्हरायटी जाखणगाव परिसरात गटाच्या माध्यमातून संजय भगत यांनी आणल्यामुळे शेतकयांचा आर्थिक स्तर उंचावला आहे असेही सदाभाऊ खोत म्हणाले
कार्यक्रमातस
उद्योजक बाळासाहेब गोरे ,व्हाईस चेअरमन संजय जाधव ,प्रमोद शिंदे( फौजी), अविनाश शिंदे ,युवराज जाधव ,धनाजी झगडे ,ओंकार भगत, गणेश देशमुख ,हनुमंत धुमाळ, अजय माने, नवले ,तानाजी जगताप, सागर शिंदे आदि शेतकरी सभासद उपस्थित होते
“ऊस तोडताना मला बोलवा”
कमी केमिकल सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून एकरी 150 टन ऊस उत्पादन घेण्यासाठी संजय भगत यांनी तंत्रज्ञानांचा केलेला वापर कौतुकास्पद आहे ऊस तोडताना मला बोलवा मला उत्सुकता लागून राहिली आहे असे सदाभाऊ खोत म्हणाले.









